मुंबई...आमची मुंबई बरेच काही शिकवून जाते.. हे रेल्वेचे पहा... गाडीत चढलात आणि कितीही गर्दी असली तरी चवथी सीट मिळवणे हे 'छोटया इन्व्हेस्टमेंट' चे बाळकडू इथूनच शिकतो. कारण तीच चवथी सीट नंतर 'तिसरी पूर्ण सीट' होईल या रिटर्नस् ची त्याला अपेक्षा असते.
दुसऱ्याने तुमच्या पायावर पाय दिला असताना त्याच्यवर खेकसणे आणि दुसऱ्याच्या पायावर तुम्ही पाय दिला असताना त्याच्या शिव्या ऐकून घेणे या दोन्ही कला इथेच शिकवल्या जातात.
हल्लीच मी अनुभव घेतला एखाद्याच्या 'फोकस' बद्दल...
एक असामी रोजच्या ठरलेल्या वेळेस जी मिळेल ती गाडी पकडतो. त्याचं वेगळेपण म्हणजे गाडी कोणतीही असेल यांना
दरवाजाच्या जवळ यथेच्छ मांडी घालून बसण्याची जागा कमावणे सहज शक्य होते. पूर्ण डब्याची गर्दी एका बाजूला आणि यांनी मिळवलेली जागा एका बाजूला. एक दोन वेळा नाही.. मी नेहमीच हे पाहिलय.
समय नियोजनाची शिकवण सुध्दा देते रेल्वेच... कोणती गाडी पकडायला किती वाजता घरून निघाले पाहिजे म्हणजे ती मिळेल... गर्दीच्या वेळी किती गाड्या सुटतील तो अंदाज घेऊन योग्य वेळेत नियोजित स्थळी पोहोचणं हे इथे आपोआपच अंगवळणी पडते.
तसे बरेच धडे रोजच गिरवले.. पण मी आपले माझे काही वैयक्तिक अनुभव तुमच्या समोर मांडले... अनेक धडे तर तुम्ही सुध्दा घेतले असतीच.
आठवत असेल एखादा तर लिहावे...!!!
-ग.वि.तळवणेकर