
पहाटेपासूनच मनाची एक वेगळीच तळमळ सुरू होती… बरेच दिवस काही मनासारखे हातून रेखाटले गेले नव्हते…
सकाळचा नाश्ता झाला आणि पायांना म्हटले "चला निघू..."
स्टेशनला आलो, एक फ्रेम करून घ्यायची होती. फ्रेम वाल्याकडे जाऊन पाहतो तर त्याचे 'दुकान बंद'.
मनात योजून काही करावे आणि ते तसेच घडणे याची शक्यता म्हणजे अगदी दुर्मिळच :( ....
पण मनाची समजून घालून निघालो पुढे >>>
खांद्यावर असलेल्या bag मध्ये पुस्तक होतेच. मग नेहमीच्या मंदिराच्या मागे असलेल्या लायब्ररीत जाउन पुस्तक बदलून घेतले… लायब्ररी मात्र नेहमी शहाण्या मुलासारखी वेळेवर उघडी असते(रविवार असला तरीही) :)
नंतर येऊन मंदिरात मोरयाचे आणि देवीचे दर्शन घेतले...
आयुष्य म्हणजे काय याचा कधीच शोध लागत नाही (कितीही प्रयत्न केले तरीही). पण इथे या मंदिरांत आले की मात्र सर्वांचा विसर पडतो.... एक वेगळीच मन:शांती मिळते. देवदर्शन एक कारण असते पण ही मन:शांती 'खूप काही' देऊन जाते.
त्या 'खूप काही' मधील हा एक क्षण....
एक वयस्कर असे गृहस्थ तिथे आले. त्यांचे देवदर्शन घेऊन झाले. तसे त्यांनी घरून आणलेली छोटीशी चौरसाकृती चटई अंथरली आणि ध्यानस्थ झाले... असे ध्यान लावून तरी जन्माचे सार्थक होईल ही एक आपली भाबडी आशा... आणि तरीही निरपेक्ष वाटणारी ही मूर्तिमंत व्यक्ती. मला माहीत नाही कुणाचे ध्यान करीत असावी ती असामी... पण एक पुसटशी शंका आपली की नक्कीच मोरयाचे नामस्मरण करीत असतील अशी.
आणि हा क्षण टिपण्याचा मोह अनावर झाला... रेषा तेवढ्या clear नसतील पण भाव टिपण्याचा हा जलद प्रयत्न... हा क्षण तुझ्याच नावे अर्पिला मोरया... _/\_
No comments:
Post a Comment