मला लहानपणापासून चित्रे फार आवडायची. मला आठवते....मी शिशुवर्गात असताना पतंग काढला होता अन तो पेन्सिलने (रंगीत) रंगवला...एकदम नीटनेटके चित्र असल्याने मला बाईंनी एक प्लास्टिकचा चेंडू आणि लिमलेटच्या गोळ्या "बक्षीस" दिल्या होत्या.
मी उत्तरोत्तर चित्रे काढीत होतो. चित्रकला स्पर्धांत भाग घेत होतो. मित्रांच्या चित्रकलेच्या वह्याही पूर्ण करून द्यायचो. पण .......
एक चुकीचा निर्णय घेतला तो म्हणजे शाळेतील Elementary आणि Intermediate या दोन परीक्षा न देऊन ......आठवी ते दहावी अभ्यासाकडे लक्ष जास्त द्यावा लागला. चित्रांकडे थोडे दुर्लक्षच झाले.मग काय नेहमीच्या रुळलेला Commerce चा मार्ग धरला अन पंधरावीपर्यंत औपचरिकपणे पूर्ण केले. अगदी 'First Class' मिळवला प्रत्येक बोर्डाच्या परीक्षेत.
पण पंधरावीच्या वर्गात असताना अचानक अभ्यासासोबत हात चित्रांकडे वळू लागले....रात्री उशीरा जागून अभ्यास व चित्रे दोन्ही चालायचे अन रात्र कधी संपली ते कळायचे नाही. एवढेच नाही तर मी पंधरावीच्या सराव परीक्षेत समोरच्या प्रोफेसरांचे व्यंगचित्र काढून पेपर लवकर संपवला होता...त्यावर मला तपासणार्या शिक्षकाच्या Comments मिळाल्या...'मला ताबडतोब स्टाफ रूम मध्ये भेटा'. अन खाली मार्क '९/१००' आणि बोर्डात मात्र '८५/१००'.... अतिशयोक्ती नाही...फक्त एक किस्सा सांगितला..
आणि जेमतेम First Class चा टप्पा पार केला पण एक समाधान होते की मला ती चित्रांची दुनिया पुन्हा गवसली होती.
सुरुवात व्यक्तीचित्रांपासून झाली... पेन्सिल स्केच काढताना फार मजा यायची अन अजूनही येते याला कारण म्हणजे 'Drawing' हाच तर चित्रांचा आत्मा आहे आणि जर तुमचे 'Drawing' चांगले असेल तर काही अशक्य नाही. आणि बरं का अजूनही माझे 'Drawing' सर्वसाधारणच आहे... वेळ लागेल 'अचूकपणा' यायला.
आता मी Officeला जातो व त्याबरोबर हा छंद जोपासला आहे....सतत स्केचिंग करत राहणे हे माझे औषध (च्यवनप्राश) आहे आणि कदचित यामुळेच आयुष्य वाढते.
पुढे आपण बोलूच....
आपला
गणेश वि. तळवणेकर
Aflatoon blog aahe
ReplyDeletenice blog hmmmm........mi paan exams dilya nahi shalet astana......mala pan drawings kadyala avdatat......mi creative Career madhech phude janar aahe .....
ReplyDelete